ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे ही ग्रामपंचायत 11 सदस्यांची आहे. तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या आहेत. किवत ही नव्याने तयार करण्यात आलेली ग्रामपंचायत आहे. येथील सात जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ