Pune News : पवार समर्थकांनी गोविंदबाग फुलली; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा
पुणे : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो.पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास आहेत. या सर्वांची एकत्रित भेट व्हावी, काही दिवस एकत्रित घालविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीनिमित्त एकत्रित येत पाडव्यासह दिवाळी सण