पुण्यात गुजरात विजयानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष !
पुणे : गुजराथ निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजपा पुणे शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. गुजराथ विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणि प्रेमाचे प्रमाण आहे. भाजपाच्या सर्व समावेशक विकासाच्या धोरणावर जनतेनी दाखवलेला विश्वास हेच ह्या यशाचे मुख्य कारण आहे अशा भावना शहराध्यक्ष मुळीक यांनी व्यक्त