गणेश जयंती 2023 : आज गणपती बाप्पांची अशी करा पूजा ; संकट आणि आर्थिक अस्थिरतेपासून मिळेल मुक्ती
गणेश जयंती 2023 : पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे ती गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला गणेश जयंती, माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि वरद तिल कुंड चतुर्थी असेही म्हणतात. आज गणपतीची पूजा करण्यासोबतच