Sindhudurg News : कुटुंबावर दु:खाचा डोंगर ! सकाळी पाणी सोडायला गेला; अन्..
सिंधुदुर्ग : आज महाराष्ट्रात सगळीकडे गणपतीचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील चौके-गोड्याचीवाडी येथील व्यावसायिक राजकमल वामन गावडे (36) या युवकावर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काळाने घाला घातला आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता त्याला वीजेचा शॉक लागला