ध्वनी मर्यादेच्या नियमांचे पालन करा ; अन्यथा गुन्हे दाखल करणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
पुणे : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसताना पुणेकर गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहेत. अशातच आता लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्याचा दिवस आहे. त्यामुळे शहरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मिरवणुका ठरलेल्या मार्गांवरून विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे डीजेचा दणदणाट आणि ढोल ताशाच्या