Aslam Shaikh : काँग्रेस नेते अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना कॅनेडियन गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार बोलत असल्याचं सांगून एका कॉलरने अस्लम शेख यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रविवारी बांगुर नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.