राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तुमचा दाभोळकर होणार अश्या प्रकारची धमकी देण्यात आली आहे.