ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? खासदार प्रताप जाधव यांचा मोठा दावा; ‘ते’ 8 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार, वाचा सविस्तर
बुलढाणा : बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या दाव्यानुसार उद्धव ठाकरेंकडे असणारे 15 पैकी ८ आमदार आणि उर्वरित ३ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटातील आणखी लोकप्रतिनिधी आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे ते थांबले आहेत.