BSNL ला मागे टाकत Reliance Jio बनली देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता कंपनी
खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला मागे टाकून देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता बनली आहे. देशात दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका खासगी कंपनीने वायरलाइन श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मंगळवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या ग्राहक अहवालानुसार, जिओचे वायरलाइन ग्राहक ऑगस्टमध्ये 73.52 लाखांवर