उपयोगाची माहिती : सिबिल स्कोअरवर ठेवा लक्ष; क्रेडिट स्कोअर किती असावा ?
अर्थकारण : कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबील स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर सतत लक्ष असल्याने गरजेचे असून त्याबाबाबतची जागरुकता भारतीय नागरिकांत वाढत चालली आहे. ‘ट्रान्स यूनियन सिबिल’च्या मते, ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या काळात सुमारे 23.8 दशलक्ष नागरिकांनी प्रथमच क्रेडिट प्रोफाईलवर लक्ष ठेवण्यासाठी नोंदणी केली आहे.