Corona News : कोरोना परत आला ! ‘या’ जिल्ह्यात आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर
सांगली : 2-3 वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona News) महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. हे सगळे आता सगळं सुरळीत सुरु असताना आता कोरोनाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर सध्या मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.