Pune News : कोपर्डी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या
पुणे : अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे