Weather Forecast : मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला रेड अलर्ट
पुणे : रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather Forecast) या जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडसह राज्याची राजधानी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांदेखील हवामान विभागाकडून (Weather Forecast) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला