Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याबरोबरच आपल्या आहाराकडेही जास्त लक्ष द्यावे लागते. तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे लोकांना सुस्त आणि थकवा जाणवतो. या काळात निर्जलीकरण होणे देखील मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे थंड आणि आरोग्यदाय पेयांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. ही पेये उष्णतेपासून आराम देण्याचे काम करतात, ते शरीर थंड ठेवतात. ते तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात.