Summer Diet

Health News : कसा असावा आपला उन्हाळ्यातील आहार

493 0

कडक उन्हामुळे अंगाची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्येही घमाच्या धारा अशी परिस्थिती आहे. अशा गरम वातावरणात आहार-विहार कसा असावा याविषयी आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया –

काही महत्वाच्या गोष्टी
उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते. त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा. या दिवसांत खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालायला सर्वांनाच आवडते .पण विशेषत: बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे आहे. पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेच्या उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यात अडथळा येता कामा नये अशा प्रकारचे कपडे असावेत. ‘सिंथेटिक’ कापडाचे कपडे टाळावेत. ते उष्णता कोंडून ठेवतात. त्याऐवजी सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा.

थंड पाण्याने अंघोळ करा, असेही सांगितले गेले आहे. शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपावे असेही सांगितले आहे. इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते. पण या दिवसांत थंड खोलीत दुपारीही थोडा वेळ झोपले तर चालू शकते. तर रात्री चांदण्यात झोपण्याचा सल्ला आयुर्वेदात आढळतो.

या ऋतूची आणखी एक वेगळी गोष्ट अशी, की या दिवसांत व्यायाम कमी करावा. अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे हलका व्यायाम या दिवसांत चांगला.

आहार कसा असावा
आंबट, खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत. त्याच्या उलट- म्हणजे मधुर, कडू आणि कषाय (तुरट) द्रव्यांचे सेवन अधिक करावे. – फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे काही खाऊ नये.

ग्रीष्मात पांढरा तांदूळ खावा. पांढरा- म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ. खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच, असे म्हणतो. पण उन्हाळ्यात तो चालेल.

आहार घेताना दर दोन तासांनी खा असे सर्रास सांगितले जाते. उन्हाळ्यात मात्र ते फायदेशीर ठरेलच असे नाही. पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, तसेच वारंवार न खाता ठरलेल्या २-३ वेळांना आहार घ्यावा, असे सांगितले जाते.

रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल.

या ऋतूत मद्यपान शक्यतो वज्र्य असावे.

पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदात ‘सुगंधी सलीला’चे सेवन करा, असा उल्लेख आहे. सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे.

पुरेसे पाणी पिणे व नेहमी बरोबर पाणी बाळगणेही गरजेचे.

जेवण कसं असावं
या ऋतूमध्ये सकाळचा नाष्टा हा फार गरजेचा असतो त्यामुळे तो कधी चुकवू नाही .नारळपाणी, फळे किंवा फळांचा रस हा नाष्ट्यासोबत नक्की घ्यावा

दुपारी जास्त भूक नसल्यास काळ्या किंवा हिरव्या चण्याचे चाट बनवून खावे आणि जर जास्त भूक असेल तर पोळीभाजी कोशिंबीर ताक भात यांचा आहारात समावेश करावा

संध्याकाळचा नाष्ट्यासाठी चुरमुरे भेळपुरी अश्या गोष्टी खाव्या. कधी कधी थंडगार जूस, पेय प्यावे

रात्रीचे जेवण यादिवसात फार हलके असावे. सलाड, भाज्या या जास्त प्रमाणात असाव्यात तसेच म्हशीचे दूध केसर टाकून पिल्याने शांत झोप लागते.

Share This News
error: Content is protected !!