Tiger is Back : संजय राऊत यांच्या जामीन मंजुरीनंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…! वाचा सविस्तर

307 0

मुंबई : 31 जुलै पासून कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मंजूर झाला. दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या जामीनाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका ईडीने पुन्हा दाखल केली होती. तथापि ही याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जल्लोष सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या सुटके विषयी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे पाहूयात…

सुषमा अंधारे
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांचे डोळे देखील पाणवले होते. त्या म्हणाल्या की, “संजय राऊत यांच्या जामीनामुळे आम्हाला हजार हत्तींचे बळ मिळाले. आम्ही अत्यंत आनंदी आहोत. ठाकरेंची तोफ समजले जाणारे संजय राऊत लवकरच तुरुंगा बाहेर येतील. आता जलवा पहा” असा इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे. तर टायगर इज बॅक असे ट्विट देखील सुषमा अंधारे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे

See the source image
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. आम्ही सर्व शिवसेना कुटुंबाकडून त्यांचे स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली ते म्हणाले की, “संजय राऊत हे डरपोक नाहीत. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला गेला. तरीही त्यांनी गद्दारी केली नाही. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. तरीही ते घाबरले नाहीत.

अंबादास दानवे
विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील संजय राऊत यांच्या जामीनानंतर आनंद व्यक्त करून एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले आहेत की, “माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार… विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात आणि हो कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.”

खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या जामीनावर भाष्य करताना म्हटले आहे की, “मी भविष्य सांगू शकत नाही. वास्तवातच जगते आमचे जे जे नेते जेलमध्ये आहे ते त्यांच्या केसेस मधून निर्दोष बाहेर येतील. ते महाराष्ट्र भारताच्या सेवेत पूर्ण ताकदीने लागतील अनिल देशमुख यांना एका केस मध्ये एक बेल मिळाली. सगळ्यांच्या लेकि सुना पूर्ण ताकदीने कोर्टात जातात. वकिलाकडे जातात जेलमध्ये जाऊन लढतात. त्यांचा अभिमान आहे. त्यांना माहिती आहे विजय त्यांचा आहे.

See the source image

क्लाईड क्राफ्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्राफ्ट यांनी देखील एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. यामध्ये एक वॉशिंग मशीन काढले असून त्यावर बीजेपी असे लिहिले आहे. तर या वॉशिंग मशीनला संजय राऊत लाथ मारत ,”मे झुकेगा नही” असे म्हणत आहेत.

रोहित पवार
रोहित पवार यांनी देखील संजय राऊत यांच्यासाठी आनंद व्यक्त करून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पिंजऱ्यातून एक वाघ बाहेर पडत आहे. असा हा व्हिडिओ आहे. त्यावर सत्यमेव जयते असे कॅप्शन देखील दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!