crime

बहिणीची छेड काढली, ताकीद देऊनही ऐकलं नाही, म्हणाला मी तिच्यासोबत …! संतापलेल्या भावानं थेट उचललं टोकाचे पाऊल, नाशिकमधील खळबळजनक घटना

977 0

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणांन आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विकास नलावडे हा अमोल साळवे यांच्या बहिणीची सातत्याने छेड काढत होता. त्याची तक्रार या मुलीने भावाकडे केली होती. त्यानंतर अमोल साळवे यानी ताकीद देऊनही विकास नलावडे यानी तिचा पाठलाग करणे सोडले नाही. त्यानंतर भाऊ अमोल साळवे आणि त्याच्या मित्रान धारदार शस्त्रान वार करून विकास नलावडे याचा खून केला आहे.

विकास नलावडे याला पुन्हा ताकीद देण्यासाठी म्हणून बोलावलं होतं, पण त्या ठिकाणी त्यानी अमोलच्या बहिणीशी थेट लग्न करणार असल्याचे म्हटलं, त्यामुळे संताप अनावर होऊन अमोल यानी विकासावर धारदार शस्त्रांवर केले.

विकास याला रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!