Shinde-Fadnavis Government : सरपंच निवड आता जनताच करणार ; विधानसभेत विधेयक मंजूर

351 0

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली . मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आज विधानसभेत मांडले . हे विधेयक सभागृहामध्ये बहुमताने पारित करण्यात आला आहे . त्यामुळे आता सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे .

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातखाली मागील सरकारने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता . तो निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला . काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेणार असल्याची घोषणा केली होती. सरपंच निवडणुकीमध्ये होणारे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी जनतेतून सरपंच निवडला जावा अशी मागणी भाजपने त्यांनी केली होती

Share This News
error: Content is protected !!