#CM EKNATH SHINDE : नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री आजोबा पोहोचले गल्लीतल्या किराणा दुकानात; व्हिडिओ होतोय व्हायरल

725 0

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. अतिशय सामान्य जीवन जगलेले आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आपल्या नातवासह ठाण्याच्या त्याच गल्लीतून फिरताना दिसले. ज्या गल्लीत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यतीत केल आहे.

आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी त्याला घेऊन किराणा दुकानात मुख्यमंत्री आजोबा पोहोचले. तिथे नातवाला खाऊ आणि दोन बॉल खरेदी करून दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतं आहे.

होळीच्या कार्यक्रमासाठी ठाण्यातील किसन नगरमध्ये मुख्यमंत्री पोहोचले. याच किसननगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपलं आयुष्य जगल आहे.

खुद्द मुख्यमंत्र्यांना पाहिल्यानंतर अनेकांना हा क्षण व्हिडिओमध्ये कैद करण्यासाठी आवर घालता आला नाही. या तीन पिढ्या किराणा दुकानात पोहोचल्या तिथे नातू रुद्रांश याला खाऊ खरेदी करून दिल्यानंतर दोन बॉल देखील खरेदी करून दिले. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या किराणा दुकानदाराला पैसे देऊ केले.

Share This News
error: Content is protected !!