#MUMBAI CRIME : कस्टम मधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या लाचखोरीच्या रॅकेटचा भांडाफोड ; छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार

754 0

मुंबई : कस्टम मधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या लाचखोरीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात सीबीआयला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रवाशान केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवस लागोपाठ तीन घटना उघडकीस आल्यानंतर सीबीआयने भांडाफोड केला आहे.

काय आहे प्रकरण
परदेशातून मुंबई विमानतळावर उतरलेल्या श्रीमंत प्रवाशांना हेरलं जायचं. त्यानंतर त्यांची झाडाझडती घेऊन कस्टम मधील अधिकारी त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. या प्रवाशांनी परदेशातून काही मौल्यवान वस्तू खरेदी केलेल्या असायच्या, त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांना देखील हे प्रवासी रक्कम द्यायला तयार होत होते. हे पैसे एका विशिष्ट गुगल पे अकाउंट वर पाठवले जात होते.

या संपूर्ण घटना क्रमामध्ये लोडर देखील सहभागी होता. विशिष्ट गुगल पे नंबर वर हे पैसे पाठवल्यानंतर हा लोडर विमानतळाच्या बाहेर जाऊन पैसे एटीएम मधून काढून आणायचा, स्वतःचा कमिशन घ्यायचं आणि बाकीचे पैसे हे अधिकाऱ्यांना देत होता.

दरम्यान एका प्रवाशांना तक्रार केल्यानंतर सीबीआयने याची शहानिशा करून घेतली. दहा दिवसात तीन घटना उघडकीस आल्यानंतर या कस्टम अधिकाऱ्यांना गजाआड करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide