नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या विरोधात आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता उद्या बुधवारी निर्णय होणार आहे.
दरम्यान बुधवारी नक्की काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही याचिका आज न्यायमूर्तींसमोर मांडण्यात आली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अन्यथा शिवसेनेचे बँक अकाउंट, पक्षनिधी सर्व जाईल असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील एडवोकेट कपिल सिब्बल यांनी केला. यावर तुम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊ शकता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उद्या बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. आधी सत्ता संघर्षाची सुनावणी घेऊ, त्यानंतर निवडणूक आयोगा विरोधातील याचीकेवर सुनावणी घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे.