Kanthameni Uma Maheshwari suicide : टीडीपीचे संस्थापक एन.टी. रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

313 0

हैदराबाद : कंथामेनी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. कंथामेनी उमा माहेश्वरी या तेलुगु देसम पार्टीचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या धाकट्या कन्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कंथामिनी माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला .

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार , उमा माहेश्वरी या एनटी रामराव यांच्या चौथ्या कन्या होत्या. आजारपणामुळे त्या त्रस्त होत्या . काही दिवसांपासून त्या डिप्रेशनमध्ये देखील होत्या. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे.

एन.टी. रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. त्या सह फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. 1982 साली त्यांनी पक्षाची स्थापना केली . एनटी रामाराव यांचे वयाच्या 72 व्या वर्षी कार्डियाक रअरेस्टने निधन झाले.

Share This News
error: Content is protected !!