भीमा कोरेगाव प्रकरण : ‘या’ कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाचा वरवरा राव यांना सशर्त जामीन

230 0

भीमा कोरेगाव प्रकरण : ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना आज सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. हा जामीन वैद्यकीय कारणास्तव मंजूर केला असल्याचे समजते. वरवरा राव  यांनी ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय कोर्टाचे अधिकार क्षेत्र सोडून नये , सवलतीचा गैरवापर करू नये, त्याचबरोबर साक्षीदारांच्या संपर्कात राहता येणार नाही या शर्तींवरच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये राव यांची प्रकृती खालावली असून , त्यावेळी त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . कोरोनाच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नव्हता.  सध्या 81 वर्षाचे बरोबर राव यांची प्रकृती अधिक खालावली असल्याचे समजते.

31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाडा येथे एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्यानंतर त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणांमध्ये एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरवल्याचे देखील निष्पन्न झाले होते .या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती .पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचनात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. या माओवादी संघटनांची संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला वरवरा राव यांना अटक केली होती.

Share This News
error: Content is protected !!