परीक्षेत नापास झाला म्हणून विद्यार्थ्याने गुगलवर ठोकला 75 लाख रुपये नुकसानीचा दावा; म्हणे youtube वरच्या अश्लील जाहिरातींमुळेच…

284 0

मध्य प्रदेश : अभ्यास करत असताना युट्युब वर येणाऱ्या अश्लील जाहिरातींमुळे लक्ष विचलित झाले म्हणून नापास झालो असा दावा करून विद्यार्थ्यांनी गुगलकडे थेट 75 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली हा विद्यार्थी थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, या विद्यार्थ्याचं नाव आहे आनंद किशोर चौधरी हा मध्य प्रदेश मधील पन्ना या ठिकाणी राहतो आनंद चौधरी हा पोलीस भरती आणि राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असताना youtube चा वापर करत होता पण युट्युब वरून अभ्यास करत असताना मध्ये येणाऱ्या अश्लील जाहिरातींमुळे लक्ष विचलित झाल्याची तक्रार यांनी केली आणि याच जाहिरातीमुळे मी नापास झालो अशी तक्रार करून 75 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली.

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असते वेळी कोर्टाने या विद्यार्थ्याला चांगलंच फटकारला आहे तुम्हाला जाहिराती पाहायच्या नसतील तर पाहू नका या प्रकारच्या याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे असा न्याय निवाडा सुप्रीम कोर्टाने केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide