पुण्यातील तरुणांनं ‘एआय’च्या मदतीनं सुरू केलेल्या बूस्टचाईल्ट स्टार्टअपला इनोव्हेशन इन अर्ली पुरस्कार

1151 0

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात एमएस करून, सॅनफ्रान्सिस्को येथे सहा वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलेल्या विपुल जोशी यांनी बाल्यावस्थेतील मुलांची काळजी व सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) साहाय्याने शाळा, पालक व शिक्षकांसाठी बनवलेल्या ‘बूस्टमायचाईल्ड’ या स्टार्टअपची निर्मिती केली आहे. या स्टार्टअपला अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने ‘इनोव्हेशन इन अर्ली इयर्स एज्युकेशन’ हा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीममध्ये २० लाखांचा निधी मिळालेला आहे. पुण्यातील वर्धन ग्रुपच्या वतीने या स्टार्टअपची विस्तारासाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक (प्री-सीड फंडिंग) करण्यात आली आहे. त्यामुळे आता बालकांच्या सर्वांगीण विकासाला ‘बूस्टमायचाईल्ड’ ऍप व टुलकिटची साथ मिळणार आहे, अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर व ‘बूस्टमाईचाइल्ड’चे संस्थापक विपुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन शिक्षण धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत बालपणातील काळजी आणि शिक्षण उपक्रमांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित केलेले हे पुरस्कारप्राप्त ऍप एक महिना ते ८ वर्षे वयोगटातील बालकांच्या शाळा, पालक व शिक्षकांना चालना देणारे ठरणार आहे. ‘स्कुल असेसमेंट मॉड्यूल’मुळे प्री-स्कुल आणि प्री-प्रायमरी शिक्षकांना बालकांचे मूल्यांकन करण्यासह शिक्षक आणि पालक यांच्यात अखंड संवाद साधणे शक्य होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून (कोणताही स्मार्टफोन किंवा टॅब्लेट) पालक आपल्या पाल्याचे २१ क्षेत्रांच्या समावेशातील ३६० डिग्रीमधील विकासाचे मूल्यांकन व विश्लेषण करू शकणार आहेत. मुलांमध्ये सुधारणा आणि त्यांचा उत्तम विकास होण्यास प्रोत्साहन देणारी सानुकूलित मार्गदर्शक तत्त्वे आणि पाल्यासाठी विशिष्ट क्रियाकलाप ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. बाल्यावस्थेतील परिपूर्ण विकास होण्यासाठी विपुल जोशी यांचे हे स्टार्टअप मला सामाजिकदृष्ट्या खूपच प्रभावी वाटले. या वयोगटातील बालकांशी निगडित पालक, शिक्षक व शाळांमध्ये याविषयी जागरूकता व त्याचा वापर वाढावा, या उद्देशाने वर्धन ग्रुपने पुढाकार घेत यामध्ये सुरुवातीला एक कोटींची गुंतवणूक केली आहे, असे नितीन जावळकर म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!