नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवासाच्या कचोरीची खास रेसिपी

358 0

सध्या नवरात्र उत्सवामुळे उपवासाच्या पदार्थांची सर्वच जण चव चाखणार आहेत काही जण नवरात्र उठता बसता उपवास करतात तर अनेक जण संपूर्ण नऊ दिवस देखील उपवास करतात चला तर मग पाहूयात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवासाच्या कचोरीची खास रेसिपी …

पारीसाठी – 4 ते 5 बटाटे उकडून घ्यावे. त्यात अर्धी वाटी साबुदाणा पीठ, अर्धी वाटी भगर पीठ किंवा राजगिरा पीठ, मीठ घालून सैलसर गोळा बनवून घ्यावा.

सारणासाठी – पनीर, ओलं खोबरं, मिरची, आलं, मीठ, मनुके, काजू, बदाम चवीनुसार साखर घालून हे सगळं एकत्र करून सारण तयार करावं.

आता बटाट्याच्या पारी मध्ये वरील सारण भरून कचोऱ्या तयार कराव्या आणि अगदी कडकडीत गरम तेलात खरपूस तळून घ्याव्या. नारळाच्या चटणी बरोबर कचोरी मस्त लागते. या कचोऱ्या बनवायला पण कमी वेळ लागतो आणि संपायला पण.

Share This News
error: Content is protected !!