दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांना पितृशोक; वडील कृष्णा यांचं निधन

430 0

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं आज मंगळवार निधन झालं. पहाटे 4 वाजता हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिॲक अरेस्टमुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते 80 वर्षांचे होते.

कृष्णा हे साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील होते. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार झाले. मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारण सोडलं.

कृष्ण यांचं खरं नाव घट्टमनेनी शिवा राम कृष्णमूर्ती असं आहे. त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कृष्णा हे त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. 2009 त्यांना पद्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

See the source image

काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं.

Share This News
error: Content is protected !!