UPDATE : …म्हणून सिनेनिर्माता कमल किशोर मिश्रा याने थेट बायकोला गाडी खाली चिरडलं ! हायप्रोफाईल केस

218 0

मुंबई : स्वतःच्या बायकोला कार खाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार 19 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये घडला. विशेष म्हणजे हि व्यक्ती कोणी सामान्य नसून सिनेनिर्माता कमल किशोर मिश्रा हा आहे. या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानांतर हि घटना अधिक चर्चेत अली आहे. या विषयी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कमल किशोर याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. 

19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. कमल किशोर यांच्या पत्नीने त्याला एका महिलेसोबत गाडीत पाहिलं होतं. त्यामुळे कमल किशोर याला अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यावेळी कमल किशोर यांनी बायकोचा विरोध झुगारुन निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोनं त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कमल किशोर यांनी बायकोच्या अंगावरुनच गाडी नेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

आंबोली पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. निष्काळजीपणे वाहन चालवणं आणि एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कमल किशोर मिश्रा यांच्यावर बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!