… म्हणून अजितदादांवर टीका नको; भाजपा नेत्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विनंती

859 0

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझरमधून स्तंभलेखक रतन शारदा यांनी अजित पवारांनासोबत घेण्यावरून भाजपाचे कान टोचले होते.

त्यानंतर साप्ताहिक विवेक मधूनही अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावर टीका करण्यात आली होती. मात्र आता भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन अजित पवारांवर टीका करू नये अशी विनंती केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पाडली. या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांनी संघाला विधानसभेला सहकार्य ठेवण्याची मागणी केली. भाजप आणि संघाच्या बैठकीत राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली. भाजपाने आपली भूमिका संघासमोर स्पष्ट करताना, “अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळेच संघाने अजित पवार गटावर टीका करणं टाळावं,” अशी विनंती देखील भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!