गायक स्वप्नील बांदोडकर यांचं “सांग प्रिये” रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

431 0

गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं आता ‘सांग प्रिये’ या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज दिला आहे.

कोमल खिलारे आणि सोहम चांदवडकर  ही नवी जोडी त्यात झळकली असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना या गाण्याचा आस्वाद घेता येईल. कोमल ही डाॅक्टर तर सोहम हा पायलट असून दोघेही प्रसिद्ध माॅडेल आहेत. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे, तर अमेय मुळे यांनी संगीत रचना, निखील श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे.

आजवर स्वप्नील बांदोडकरनं अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्नीलची खासियत आहे. त्यामुळे स्वप्नील तरुण-तरुणींचा लाडका गायक आहे. सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं स्वप्नीलनं अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे.

Share This News

Related Post

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाची सर्व तयारी पूर्ण ; 23 सप्टेंबरला होणार लोकार्पण

Posted by - September 13, 2022 0
अहमदनगर : आष्टी-अहमदनगर रेल्वेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. रेल्वेची ट्रायल देखील घेण्यात आली. येत्या 23 सप्टेंबरला आष्टी अहमदनगर रेल्वेचे…
Threatening Mail

Threatening Mail : खळबळजनक ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा ‘तो’ मेल हॉस्पिटलला नसून एका व्यक्तीला आला; पुणे पोलिसांनी केले स्पष्ट

Posted by - August 9, 2023 0
पुणे : पुण्यात दहशतवादी कारवायांचा कट उघड झाला असतानाच अजून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील राहुल तायाराम दुधाणे…

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि…

गणेश चतुर्थी विशेष : श्रीगणेशाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक रेसिपी

Posted by - August 27, 2022 0
श्रीगणेशाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक रेसिपी स्टफिंग तयारी : प्रथम, एका मोठ्या कढईमध्ये 1 टीस्पून तूप गरम करा आणि 2…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *