Govindbagh

Pune News : पवार समर्थकांनी गोविंदबाग फुलली; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा

4398 0

पुणे : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो.पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास आहेत. या सर्वांची एकत्रित भेट व्हावी, काही दिवस एकत्रित घालविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीनिमित्त एकत्रित येत पाडव्यासह दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सवात साजरा करतात.

दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय नागरिकांना भेटत असतात. तसेच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, कलाक्रीडा, आधी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंदबागेत दाखल होत असतात. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. सध्या या ठिकाणी संपूर्ण पवार कुटूंबीय हजर आहेत.

सध्या राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे आता आजच्या कार्यक्रमाला अजित पवार हजर राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!