विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? मसाज सेंटरमध्ये नोकरी देतो असं सांगून…

1474 0

पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढताना दिसत असून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात एका मसाज सेंटरमध्ये परदेशी महिलांना नोकरीस ठेवून व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोंढव्यातील एका मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या कारवाईत पोलिसांनी चार परदेशी महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या चार महिला मूळच्या थायलंडच्या असून त्या नोकरी करण्याचा व्हिसा नसताना मसाज सेंटरमध्ये काम करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांना मुंढव्यातील शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. चार महिलांना लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!