सदाभाऊ खोत यांचे केतकी चितळेला समर्थन, त्यावर रुपाली पाटील यांची खोतांवर टीका

123 0

पुणे- शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळेंला समर्थन दिले आहे. मला तिचा अभिमान आहे असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदाभाऊ खोतांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोबरे यांनी समाचार घेतला आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, “जी अवस्था केतकी चितळेची झाली तीच अवस्था सदाभाऊ खोत यांची झाली पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल की किती वेदना होतात. ते जे म्हणत आहेत की केतकीवर आलेल्या कमेंट बघा, अरे तुम्हीच जर विकृती पसरवत आहात तर तुम्ही लोकांच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशी करू शकता ? सोशल मीडियावर अशी विकृती आणणारे सदाभाऊ खोत व भाजप आहे अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत ?

सदाभाऊ खोत यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केतकीचं जोरदार समर्थन केलं. सदाभाऊ खोत म्हणाले की, केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!