पुणे : कोंढव्यामध्ये नाल्यात आढळून आला झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा मृतदेह

330 0

पुणे : कोंढवा, महंमदवाडी, अर्चना परॅडाईज जवळ नाल्यामधे (ओढा) एका इसमाचा मृतदेह असल्याची वर्दि सकाळी ०८•२१ वाजता अग्निशमन दलास मिळाली. कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. जवानांनी सदर मृत इसमास पाण्याबाहेर काढून उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीच्या अंगावर झोमॅटो डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा ड्रेस आहे. तसीच त्याच्या जवळ संजय कुमार यादव या नावाचे आधार कार्ड सापडून आले आहे. अधिक तपस पोलीस करत आहेत.

या कामगिरीत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांचे वाहनचालक योगेश जगताप व फायरमन तेजस खरीवले, अभिजित थळकर आणि मदतनीस अक्षय चव्हाण, अभिषेक कसबे, सतीश अरगडे यानी सहभाग घेतला.

अधिक वाचा : धक्कादायक : वाघोलीमध्ये टॅंकमध्ये पडुन 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Share This News
error: Content is protected !!