पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे परीक्षा विभागात आंदोलन

201 0

पुणे : पुणे विद्यापीठाने सर्व पदवी परीक्षांच्या निकालांच्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका आजपर्यंत विद्यार्थ्याना दिलेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षा,पदव्युत्तर प्रवेश,परदेशी शिक्षण अशा अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत आहे. परीक्षा विभाग,पुणे विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आज आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीनंतर ‘ छापील गुणपत्रिका २० दिवसांत छापून पुढील ७ दिवसांत विद्यार्थ्याना वितरित करण्यात येतील ‘ असे लेखी आश्वासन परीक्षा संचालकांकडून देण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाले आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच दिलेल्या मुदतीत पुणे विद्यापीठाकडून कार्यवाही न झाल्यास पुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी धनंजय दळवी, अभिषेक थिटे, अभिजित येनपुरे,अमोल शिंदे, परिक्षीत शिरोळे , मंदार ठोंबरे, अनिकेत भानुसे , ओमकार तुपे,रोहित बिराजदार,मयुर शेवाळे , योगेश गायकवाड व इतर मनविसे पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!