VIRAL PHOTO : प्रियंका गांधींसह काँग्रेस कार्यकर्ते संसदेपर्यंत आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे हे देशव्यापी आंदोलन अद्यापही सुरूच आहे .महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे . दरम्यान यावेळी काँग्रेस नेते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर झटापटही झाली .
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आल आहे. दरम्यान देशभरातून या आंदोलनाचे आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आल्यावरून काँग्रेस कार्यकर्ते कडाडून निषेध करत आहेत . दरम्यान प्रियांका गांधींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
या फोटोमध्ये त्या प्रचंड संतापलेल्या दिसून येत आहेत . भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट करून प्रियंका गांधींवर या महिला पोलीसाचा हात मुरगळल्याचा थेट आरोप केला आहे.
Priyanka Vadra gets violent with a lady cop on duty. Grabs her hand, twists and kicks around…
Then they complaint that police is manhandling, when exactly the opposite is true. pic.twitter.com/7ZKU4h1KDV
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) August 5, 2022
फोटो शेअर करून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की , “प्रियंका वड्रांनी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला मारहाण केली . त्यांनी तिचा हात पकडून फिरवला. पोलिसांनी कारवाई केल्यावरची ओरड काँग्रेस नेते करतात ,मात्र या ठिकाणी परिस्थिती उलटी आहे .” असा आरोप आता भाजपकडून होतो आहे.