नवी दिल्ली : भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून द्रौपदी मुर्मू यांची खास ओळख आहे. विशेष म्हणजे त्या मूळ ओडिशा राज्यातील असून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत.2022 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे
द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 मते मिळाली होती. तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती. आता दुसऱ्या फेरीमध्ये मुर्मू यांना 809 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना दुसऱ्या फेरीमध्ये 329 मते मिळाली आहेत. मुर्मू यांना दोन्ही राऊंड मिळून 1,349 मते मिळाली आहेत. त्यामुळं द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित आहे.
काही वेळातच निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मू यांच्या गावासह देशभरात आनंदोत्सव सादरा केला जातोय.