कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

91 0

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला खिंडार पडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह मोदींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.

पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार आणि नरेंद्र मोदींच्या कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार.

दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी केली.

Share This News

Related Post

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, आपमान सहन करणार नाही

Posted by - March 26, 2023 0
मालेगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत असून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब…

अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितले एकनाथ शिंदे यांच्याकडे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट

Posted by - February 10, 2022 0
ठाणे – सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. या निमित्त आयोजित ‘लोकनाथ’ या गौरव समारंभात अभिनेता प्रवीण…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळा

Posted by - June 11, 2023 0
टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त…
Sanjay Raut

Radhakrishna Vikhe Patil : ‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल’ राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका

Posted by - September 21, 2023 0
अहमदननगर : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत झाकीर…

पुणे मेट्रोमध्ये अभियंत्यांना नोकरीची संधी, जाणून घ्या सर्व माहिती

Posted by - March 2, 2022 0
पुणे- येत्या 6 तारखेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचवेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *