मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची महाराष्ट्र सरकारला विनंती

361 0

महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. लहान तोंडी मोठा घास पण आता बोलायला हवं असं म्हणत प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओद्वारे तिने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह 100% आसन क्षमतेने सुरू करण्याची कळकळीची विनंती केली आहे. लहान तोंडी मोठा घास पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत.कोरोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हाला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.त्यामध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होतो आहे.

https://www.instagram.com/tv/CZ3jv9aAV19/?utm_medium=copy_link

 

 

 

 

 

Share This News
error: Content is protected !!