पुणे- पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या प्रभाग आराखड्यावर नाराजी व्यक्त केली होती. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ३ हजार ५९६ हरकती-सूचनांची नोंद झाली आहे.
यामध्ये सर्वाधिक १ हजार हरकती या वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांनी तब्बल १ हजार ३४ नोंदविल्या आहेत. तर शिवाजीनगर -घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत केवळ १२ हरकती – सूचना आल्या आहेत.
1 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाला होता त्यानंतर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती.