मध्यप्रदेशातील चोरांनी हिंजवडीच्या लग्नसमारंभात चोरलेले दागिने मिळवण्यात पोलिसांना यश

710 0

पुणे : मध्यप्रदेश राज्यांतील, राजगड जिल्ह्यातील , बोडा पोलीस स्टेशन हद्दीतील कडीयासांसी गावातील कुख्यात चोरांनी पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील ऑर्चिड ह्या पंचतारांकित हॉटेल मध्ये एका लग्न समारंभात जवळपास 65 तोळे सोन्याचे दागिने आणि नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.

ऑर्चिड ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चोरी करून, चोरांनी त्यांचं मध्य प्रदेश राज्यातील कडीयासांसी हे मुळगाव गाठलं. अखेर हिंजवडी पोलिसांनी अतिशय कौशल्य पूर्वक तपास करून, ह्या चोरीतील जवळपास 26 लाख रुपये किंमतीचे 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तसेच ऑर्चिड हॉटेलमधील लग्न समारंभात चोरी करणाऱ्या चोरांची नाव देखील हिंजवडी पोलिसांना मिळाली आहेत.

6 डिसेंबर 2022 रोजी ऑर्चिड हॉटेल मधील लग्न समारंभात, रितिक महेश सिसोदिया, वरुण राजकुमार सिसोदिया, शालू रगडू धपाणी आणि श्याम लक्ष्मीनारायण सिसोदिया या चारही आरोपींनी बेकायदेशीर प्रवेश करून लग्न समारंभातील 65 तोळे सोन्याचे दागिने आणि नऊ लाख रुपये किमतीची रोख रक्कम पळवली होती. मात्र हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने लग्न समारंभात चोरी करणारे चोर हे मध्य प्रदेश जिल्ह्यातील कडीयासांसी गावचे रहिवासी असल्याचे समजले. त्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत या चोरीतील 52 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मात्र कडीयासांसी हे पूर्ण गावच कुख्यात चोरांच असल्यान हिंजवडी पोलिसांना चोरांना अटक करण्यात अपयश आल आहे.

Share This News
error: Content is protected !!