PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत कारवाई

192 0

पुणे : पुण्यात आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या अनेक सराईत गुन्हेगारांवर आणि टोळक्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. चुहा गँग नंतर आता सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले आणि त्याच्या टोळीतील इतरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

परिसरात वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आणि प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने या टोळक्याने विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर रित्या खंडणी मागणे, खंडणी गोळा करणे, बेकायदा जमाव जमवून मारहाण आणि दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे. अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. यातील टोळीचा प्रमुख आरोपी जितेंद्र भोसले आणि साथीदार सतीश कोल्हे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक ,अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण ,पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शना खाली विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कारभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आणि समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समोर उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत 2022 वर्षांमध्ये ही 32 वी कारवाई असून आत्तापर्यंत एकूण 95 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!