#MAHARASHTRA POLITICS : “आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार…?” राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांना टोला, वाचा सविस्तर

686 0

सातारा : कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठच्या दिक्षांत समारभासाठी कराड येथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थिताना संबोधित केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांविषयी त्यांनी भाष्य करताना म्हंटले आहे कि, बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे.

मी ज्यावेळी काँग्रेस सोडून गेलो त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना केली होती, एकटा खिंड लढवणार, ते आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळून जाणार आहेत हे त्यांनाच माहिती, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात भाजपामध्ये आलेच तर माझा विरोध असायचा कारण नाही, त्याबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल, त्या निर्णयाला अधीन राहून आम्ही काम करू, असही विखे पाटील म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!