मुंबई : सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची आज ईडीमार्फत सलग ३ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने केली जात आहेत.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “सोनिया गांधी काय देशातील 138 कोटी जनतेपैकी नाहीत का? संविधानापेक्षा त्या मोठ्या आहेत का” अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
“नरेंद्र मोदी यांची ९-९ तास सीबीआय मार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी एकही कार्यकर्ता आंदोलनाला गेला नाही. आम्ही हीच भूमिका घेतली. चौकशी करायची असेल तर , आम्ही मदत केली. ९ तास मोदींनी सहकार्य केलं. चौकशीला बोलावलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुन्हेगार आहात. नॅशनल हेरॉल्ड या केस मध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले .
कोट्यावधी रुपयांची संपत्ती थोड्या पैशात विकत घेण्यात आली . नॅशनल हेरॉल्डची हजारो कोटी रुपयांची कंपनी तुम्ही घेतली नव्हती ? इथं फक्त चौकशीसाठी बोलावलं तर आंदोलन करता , घटनेवर विश्वास नाही ? दबावाच राजकारण करता , लोकशाहीत अशा पद्धतीचे राजकारण करणे याचा अर्थ यांचा लोकशाहीवर विश्वास नाही…”!असे देखील मुनगंटीवार म्हटले आहेत.