#MUMBAI : मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि.वि.करमरकर यांचे निधन

843 0

मुंबई : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व महाराष्ट्र टाइम्सचे माजी क्रीडा संपादक वि. वि. (बाळ) करमरकर यांचे आज थोड्या वेळापूर्वी मुंबई येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. समाजवादी चळवळीत ते सक्रिय होते.

एस. एम. जोशी यांनी 1960 च्या सुमारास मुंबईत सुरू केलेल्या दै. लोकमित्रमधून पत्रकारितेची सुरुवात केली. मराठी वृत्तपत्रांत खेळ या विषयासाठी रोज संपूर्ण पानं त्यांच्यामुळे सुरू झाले.

Share This News
error: Content is protected !!