मुळशीत भूकंपाचे सौम्य धक्के ; 500 मीटर जमीन दुभंगली (पहा फोटो)

295 0

पुणे : आज मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पाचशे मीटर लांब भेग जमिनीला पडली असून , टाटा तलावाकडील जमीन साधारणतः एक ते दीड फूट खाली खचली असल्याची माहिती मिळते आहे.


दरम्यान वाघवाडी मध्ये माळीन सारखी भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता येथील बारा ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!