समृद्धी महामार्गाचा आढावा घेताना चर्चा ‘Mercedes Benz G Class’ ची; उपमुख्यमंत्री म्हणतात, गाडी अशी धावते की वाटतं…!

305 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान चर्चा होती ती उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालवलेल्या मर्सडीज बेंज जी क्लास (‘Mercedes Benz G Class’) ची दिसणारी ही गाडी उच्चभ्रू लोकांसाठीच बनवली गेली असल्याचे म्हटले जाते. त्याला कारण देखील तसंच आहे. ऑफ रोडसाठी बनवण्यात आलेल्या या गाडीची किंमत आहे तब्बल १ कोटी 72 लाख रुपये… चला तर पाहूयात या मर्सिडीज बेंज क्लासची खासियत…

मर्सिडीज कंपनीच्या इतर गाड्यांच्या तुलनेत बेंज जी क्लास ही दर्जा आणि ताकदीच्या बाबत जबरदस्त आहेत. जिप्सी किंवा थार सारखा या गाडीचा लुक असला तरीही गाडी सर्वांच्या तुलनेत जबरदस्त मानली जाते आहे. मर्सडीज बेस्ट जी क्लास ही कार दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही फ्युएल ऑप्शन मध्येही कार मिळते. ही गाडी ऑटोमॅटिक आहे. गिअर बॉक्स ऑटो टीसी प्रकारचा आहे.

या गाडीच्या पेट्रोल वेरियंटचं नाव जी63 एएमजी 4मेटीक असं असून तिची किंमत 2.55 कोटी इतकी आहे. तर डिझेल वेरिअंटचं नाव जी 350डी 4मेटिक असं असून किंमत 1.72 कोटी रुपये इतकी आहे. ही गाडी फोर व्हील ड्राईव्ह मध्ये मिळते. 2925 ते 3982cc पर्यंतच्या इंजिनमध्ये 288 ते 577 बी एचपी इतकी जबरदस्त पॉवर या गाडीत असून 600 ते 850 न्यूटन मीटर इतका टॉर्क या गाडीत आहे.

वेग प्रेमींसाठी ही गाडी खास आहे कारण शून्य ते शंभर किलोमीटर चा वेग ही गाडी अवघ्या चार पूर्णांक चार सेकंदात गाठते तर स्टॉप स्पीड ताशी 240 किलोमीटर इतका आहे आणि नऊ गिअरची ही गाडी आहे.

Share This News
error: Content is protected !!