VIDEO : पुण्यात कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू

301 0

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे.

कोंढवा येथील लुल्लानगर चौक मार्वल विस्टा बिल्डिंग पीएनजी ब्रदर्स येथे आगीची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहनं देखील पोहोचली आहेत. 2 टँकरकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हॉटेलच्या इमारतीत सातव्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झालंय. मात्र घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत.

Share This News
error: Content is protected !!