घरच्या घरी बनवा चटकदार ‘कच्छी दाबेली’

420 0

कच्ची दाबेली हा अनेकांचा आवडीचा चाट प्रकार आहे. खाऊ गल्लीमध्ये तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा कच्ची दाबेली खाल्ली असेन. तोखत , गोड , आंबट असे स्वाद यामध्ये एकत्र असतात. पण घरच्या घरी देखील तुम्ही अशीच चटकदार कच्ची दाबेली बनवू शकता. चला तर मग पाहुयात रेसिपी कच्ची दाबेलीची…

साहित्य :-
दाबेली मसालासाठी :- लाल मिरची , बडीशेप , दालचीनी, लवंग , जीरा, धणे ,उकडलेले बटाटे ,तेल ,जीरा, चिरलेली हिरवी मिरची – 2, आले लसूण पेस्ट,मीठ , लिंबू रस, साखर, पानी, बन्स, बटर, गोड चटणी, कांदा , तळलेले शेंगदाणे, किसलेले ताजे नारळ, नायलॉन सेव, डाळिंबाचे दाणे

चला तर मग आधी दाबेलीची मसाला बनवूया….

सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेऊन त्यात लाल मिरची, बडीशेप, दालचिनी, लांब, जिरे आणि धणे घालून हलवत राहा , हे मासले गरम झाल्यानंतर त्यातून सुगंध येऊ लागेल, नंतर गॅस बंद करून तो मिक्सर मधून बारीक करून घ्या . दाबेलीची मसाला तयार आहे.

आता दाबेली स्टफिंग तयार करूयात ….
त्यासाठी गॅसवर पॅन ठेऊन त्यात तेल घालावे, नंतर त्यात जिरे, हिंग व हिरव्या मिरच्या घालून थोडे तळून घ्यावे. आता त्यात हळद घालून नंतर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून चांगले मिक्स करून परतावे, नंतर त्यात लिंबाचा रस घालून नीट मिक्स करून घ्या. आता त्यात साखर आणि थोडं मीठ घालून थोडा वेळ परता . नंतर या स्टफिंगमध्ये चिरलेली कोथिंबीर घालावी.

आता पाव घेऊन मधेच कापून त्यावर बटर लावा. नंतर एका बाजूला शेंगदाण्याचा सॉस आणि दुसऱ्या बाजूला गोड चटणी लावा. नंतर बटाट्याचे स्टफिंग मधोमध लावावे.त्यावर दाबेली मसाला घाला. त्यानंतर वर बारीक चिरलेला कांदा, भाजलेले बदाम घाला काही डाळिंबाचे दाणे आणि बारीक शेव आणि तिखट दाणे टाका. आणि शेवटी हे पाव तव्यावर हलके भाजून गरम गरम सर्व करा.

Share This News
error: Content is protected !!